WhatsApp Group Join Now

CID मधील सगळ्यांचे आवडते कलाकार (Dinesh Phadnis) दिनेश फडणीस यांचे निधन अभिनेते दिनेश फडणीस यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी. या अभिनेत्याने हे जग कायमचे सोडले. 1 डिसेंबर रोजी अभिनेत्याची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते, जीवन-मरणाशी लढा देत होते शेवटी या लढाईत त्यांना काळाने हरवले आहे.

Dinesh Phadnis CID मधील 'फ्रेडी' दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे,
Image Source/ Google

CID मधील अभिनेत्याच्या निधनाची बातमी त्यांचा सहकलाकार आणि दयानंद शेट्टी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्या मित्राने दुपारी 12.08 वाजता अखेरचा श्वास घेतला. या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी हे जग सोडले. त्यांच्या जाण्याच्या वृत्ताने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

फ्रेडी (Dinesh Phadnis )चे निधन कसे झाले

रविवारी सकाळी दिनेश फडणीस ‘फ्रेडी’ यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली, त्यामुळे त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीचे अपडेटही सायंकाळी समोर आली. दयानंद शेट्टी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, परंतु त्यांचे यकृत (liver) खराब झाले होते, त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

हे पण वाचा : ‘मानापमान’ : सुबोध भावेने त्याच्या आगामी चित्रपटाचे चौथे शेड्यूल पूर्ण केले

दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांच्या करिअर बद्दल

दिनेश फडणीस यांनी ‘CID’ मध्ये अनेक वर्षे काम केले होते. 1998 ते 2018 पर्यंत त्यांनी फ्रेडरिकची भूमिका साकारली. याशिवाय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्येही ते छोट्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय ते आमिर खानचा चित्रपट ‘सरफरोश’ आणि हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’मध्येही दिसले होते