WhatsApp Group Join Now

झिम्मा २‘ ने अवघ्या तीन दिवसात बॉक्स ऑफिस वर कमाईत कोटींचा आकडा पार करत सुपर डूपर कमाल केली आहे.

 झिम्मा २ गजवतोय बॉक्स ऑफिस वर धमाल, तीन दिवसात कोटींचा आकडा पार

Jhimma 2 Movie : सध्या सगळीकडे ‘झिम्मा २’ ( Jhimma-2 )या मराठी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा ‘ चा सीक्वेल आहे. लोक ‘झिम्मा २’ ची खूप आतुरतेने वाट पहात होते आणि याचा क्रेझ चित्रपटाचा ट्रेलर आल्या नंतर सर्वत्र पहायला मिळत होता. अखेर हेमंत ढोमेनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ ला शुक्रवारी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला. आणि सध्या अवघ्या काहीच दिवसात चांगलीच कमाई करतं आहे बॉक्स ऑफिस वर धमाल गाजवत आहे. झिम्मा २ ने ३ दिवसातच ४.७७ कोटींचा व्यवसाय केला असून याचा आकडा दिवसेंदिवस वाढलेला बघायला मिळणार आहे.

हेमंत ढोमे आपल्या दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाच्या यशाबद्दल म्हणतात, आम्ही खूप ठिकाणी अनेक सिनेमा गृहाना भेट देत आहोत आणि आम्हाला हाऊस फुल्ल हा बोर्ड बघायला मिळत आहे. दर्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारवणाऱ्या आहेत लोकांकडून हा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याची प्रतिक्रिया येत आहे. प्रेक्षक पण भेटण्यासाठी आतुरतेने येत आहेत व सोशल मीडिया वरही अनेकांना मेसेज करत आहेत. प्रेक्षकांकडून ‘ झिम्मा २’ वर होणारा कौतुकाचा वर्षाव मनामध्ये भावनिक फिलिंग देणारा आहे.

हेही वाचा: Madhura Velankar : मधुरा-अभिजितच्या लग्नात घडलेला विचित्र पण मजेदार किस्सा

हेही वाचा: दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली

कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.