Kushal Badrike : कुशल बद्रिके सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि अलीकडेच त्याने एका सत्य घटनेवर आधारित एक पोस्ट शेअर केली, जी व्हायरल झाली.
अभिनेता कुशल बद्रिकेने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रात घराघरात नाव निर्माण केले आहे. अभिनयासोबतच कुशल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे तो अनेकदा चर्चेत येतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एका सत्य घटनेवर आधारित एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टची चर्चा झाली आहे.
Kushal Badrike विनोदी किस्सा
कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केले आणि लिहिले की, ही पोस्ट एका सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या लग्नाला माझ्या सासरच्या मंडळींनी कडाडून विरोध केला होता, मला नेहमी वाटायचं की माझं दिसणं हेच कारण आहे. आता हे फोटो हाती येईपर्यंत मी या ‘गैरसमजात’ होतो.
हे पण वाचा : “झिम्मा २” गजवतोय बॉक्स ऑफिस वर धमाल, तीन दिवसात कोटींचा आकडा पार
त्याने पुढे लिहिले की, हे फोटो मला मिळाले त्या क्षणी मी सुनयना कडे तडक गेलो आणि फोटो दाखवून तिला म्हणालो “ ह्या मुलाला तुम्ही नाकारल होतं, ह्या अश्या दिसणाऱ्या मुलाला नाकारण्याची तुमची हिंमत झालीच कशी” ? सुनयना मला शांतपणे म्हणाली की “ तू अजूनही तसाच दिसतोस, हल्ली कॅमेरे बऱ्या क्वालिटीचे आलेत.मग मी आरशात एकदा स्वतःला पाहिलं आणि माझा “गैरसमज” संपूर्ण दूर झाला ! खरंच… टेक्नॉलॉजी काय विकसित झाली आहे यार, कॅमेरे चांगले आलेत मार्केटमधे. (सुकून) @sanjaymandre तुझा कडचा कॅमेरा भारी आहे .